व्रुक्षारूढे सुमित्राने | लंका ती
देखिली पुढे |
झळकले कळस लंकेचे | हारीने गोपुरे किती
|| १८ ||
झरोके उंच माड्याचे झर्झार नभ रेखिले |
मार्तंडमंडळा ऐसी | दैदिप्ये देखिली पुढे
|| १९ ||
झापडी पडिली नेत्री | उदो उदो म्हणे फणी |
झापडी पडिली नेत्री | उदो उदो म्हणे फणी |
रामराजा माहाराजा | वरू हा दिधला तया ||
२० ||
जन्ननी रामवरदानी | तधीपासुनी बोलिजे |
उदंड ऐकिले होते | प्रचीत मजला असे || २१
||
प्रतापगिरीचे ठाई | आदिशक्ती विराजते |
कामना पुरते तेथे | प्रचीती रोकड्या जनी
|| २२ ||
तुळजापुरीची माता | प्रतापेची प्रगटली |
आदिशक्ती माहामाया | कुळीची कुलस्वामिनी
|| २३ ||
कुळची पाळिले आम्हां | रक्षिले बहुतांपरी
|
बाळकू काय मातेचे | उत्तीर्ण होऊ पाहते
|| २४ ||
तैसा मी किंकरू तीचा | विचारे ठावही नाही
|
तिची ती वैष्णवी माया | तारीते मारिते
जनी || २५ ||
शक्तीने
पावती सुखे | शक्ती नस्तां विटंबना
|
शक्तीने नेटका प्राणी | वैभवे भोगतां
दिसे || २६ ||
कोण पुसे अशक्ताला | रोगीसे बराडी दिसे |
कळा नाही कांती नाही | युक्ती बुद्धी
दुरावली || २७ ||
साजिरी शक्ती तो काया | काया मायाची
वाढवी |
शक्ती तो सर्वही सुखे | शक्ती आनंद भोगवी
|| २८ ||
सार संसार शक्तीने | शक्तीने शक्ती भोगिजे |
शकत तो सर्व ही भोगी | शक्तीवीन दरिद्रता
|| २९ ||
शक्तीने मिळती राज्ये | युक्तीने येत्न
होतसे |
शक्ती युक्ती जये ठाई | तेथे श्रीमंत
धावती || ३० ||
युक्ती ते जाड
कळा | विशक्तीसी तुळणा नसे |
अचूक चुकेना कोठे | त्याची राज्ये समस्तही || ३१ ||
युक्तीने चालती सेना |युक्तीने युक्ती
वाढवी |
संकटी आपणा रक्षी |रक्षी सेना परोपरी ||
३२ ||
उदंड स्वस्तीची कामे | मर्द मारुनी जातसे
|
नामर्द काय तो लंडी | सदा दुश्चित्त
लालची || ३३ ||
फिताव्याने बुडती राज्ये | खबरदारी असेचिना |
फिताव्याने बुडती राज्ये | खबरदारी असेचिना |
युक्ती ना शक्ती ना बेगी | लोक राजी
असेचिना || ३४ ||
व्रुक्षावर बसलेल्या सौमित्राने
,लक्ष्मणाने लंका समोर पाहिली त्याने लंकेचे झळकणारे कळस पाहिले .रांगेने असलेली
गोपुरे पाहिली .उंच माड्यांच्या खिडक्या पाहिल्या .झरझर वाणारे नभ पाहिले
.डोळ्यांवर झापडी पडली फणी [शेष ]म्हणजेच लक्ष्मण उदो उदोचा गजर करू लागला .महाराज
श्रीराम म्हणू लागले –हा वर तू दिलास
खरा ! मग ह्या जननीला तुळजामातेला तेव्हा पासून रामवरदायिनी म्हणतात .मी
तिच्याविषयी खूप ऐकले होते पण तिची प्रचीती मला आली नव्हती .प्रताप गडावर जी
आदिशक्ती विराजमान आहे तेथे भक्तांच्या ईच्छा पूर्ण होतात अशी रोकडी [प्रत्यक्ष
]प्रचीती लोकांना येते .तुळजापूरची माता प्रतापगडावर प्रगट झाली आहे .ती आदिशक्ती
महामाया आहे ,शिवरायांच्या कुलाची कुलस्वामिनी आहे. बालकाला [शिवरायांना ] या
स्वामिनी ने पाळले आहे .त्याचे रक्षण केले आहे . अफझलखाना पासून शिवरायांचे रक्षण
केले आहे .मग तीची उतराई कशी करता येणार ? मी [समर्थ रामदास ]तिचा किंकर [दास] आहे
.मी काही विचारही करू शकत नाही .आई तुळजाभवानीची वैष्णवी माया लोकांना तारते तशी
मारते सुध्दा .चांगली शक्ती असणारे शरीर सुख मिळवते तर शक्ती नसली तर विटंबना होते
.शक्तीने युक्त असलेला मानव वैभव भोगताना दिसतो .अशक्त माणसाला कोण विचारतो ? रोगी
,अशक्त ,अशा माणसाला कांती नाही ,तो कळाहीन असतो त्याच्यापासून युक्ती आणि बुद्धी
दोन्ही हिरावली जाते .चांगली शक्ती असणारे शरीर मायाच वाढवते .शक्तीने सर्व सुखे
मिळतात .शक्तीने आनंद मिळतो .शक्तीने राज्य मिळतात .युक्तीने प्रयत्न होतात .शक्ती
आणि युक्तीने श्रीमंती धावते . युक्तीने पांडित्य असते ज्याच्याकडे शक्ती नाही ,जो
विषाक्त आहे ,त्याची लोनाशीच तुळणा होत नाही .जो अचूक असतो ,जो चुकत नाही ,त्याचे
राज्य असते .युक्तीने राज्याची सेना चालवावी लागते .युक्तीने युक्ती वाढते .आपल्याला संकटात रक्षण करता येते
.स्वास्थ्यासाठी अनेक कामे मर्द करून जातात .नामर्द काय करणार ? तो सदा दुश्चित्त
,लालची असतो .फितुरीने राज्य बुडतात .कारण तेथे कोणतीही खबरदारी घेतली जात नाही या
[बेगी] वेळेस शक्ती युक्ती कामास येत नाही .||३४ ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें