५
सामान्य देव ते केले | अंतरात्मा विशेष
तो |
परंतु शेवटी जातो | धन्य देव निरंजनू
||१||
चळेना ढळेना देवो |रुळेना मळेना कदा |
तुटेना फुटेना काही | आदी अंती जसा तसा
||२||
दोनी पुरुष ये लोकी | क्षराक्षरचि बोलिजे
|
क्षर ही तो सर्वही दिसे | साक्षी कूटस्थ
अक्षर ||३ ||
उत्तम ईश तो अन्यू |परमात्मा चि बोलिजे तया |
नाम रूपे नसे तेथे
| निर्विकार गुणातीतु || ४ ||
छेदिना छेदिता येतो | जळेना पावके कदा |
उदकाने काळबेना तो | सोशेना वात लागतां
||५ ||
भूमी ना आप ना वन्ही | वायो चंचळ तो नव्हे
|
भुते गुणे अंतरात्मा | त्याहूनही वेगळा
आसे || ६ ||
देहे चत्वारी ब्रह्मांडी | पंचीकारंची
बोलिजे |
तो देहे निर्शता कैसे | कोण ते काय उरले
|| ७ ||
निर्गुणी ते गाठी घालावी | त्रिगुणी ते
बरे नसे |
गुणातीत परब्रह्म |संत्संगेची पाविजे ||
८ ||
सारासार विचारावे |नित्यानित्य विवेक हा
|
दृश्य ते नासते जाते | क्षणक्षणा
काळांतरीं || ९||
अदृश्य दृश्य हे दोन्ही | निराभासी न भासती |
दृष्टी भासित तो भासी | कल्पना ते
कळहोवरी|| १०||
निर्विकल्प परब्रह्मी | कल्पना पाहता नसे
|
कळेना आकळेना ते | आनुर्वाच्य म्हणोनिया
||११ ||
जाणसी तितुका मी या | सांगसी तितुके
नव्हे |
सर्व संग परीत्यागे | वृत्ती शून्य
महामुनी ||१२ ||
निवृत्ति उन्मनीमध्ये | काये वाच्यांशे
बोलिजे |
लक्षाश कल्पना लक्षी | निर्विकल्पी
असेचिना || १३ ||
पंचीकर्ण महावाक्ये | देहे चात्वारे
निराशाने |
अहं सोहं नुरे जेथे | मुख्य स्थिती बरी
पाहा ||१४ |\
पाहावे बोलणे कोणे | साधकू गुप्त जाहला |
बोलिजे कळाया साटी | कळतां कळणे नसे ||
१५ ||
जड ते जाणती सर्वै | कोण्ही ते चंचलाकडे
|
निश्चळी लक्ष लावी सा | विरुळा पाहातां
जनी || १६ ||
उत्तमु प्रत्ययी ज्ञानी | मध्यमू शास्त्र निर्णया |
आधमू लोक धाटीचा | पाषांडी अधमोधमु || १७ ||
उत्तमु कल्पनातीत | मध्यामू शब्द बोलिका |
अधमु नेणता गर्वी | पापात्मा अधामाधमू || १८ ||
उत्तमु मुख्य ज्ञानी तो | मध्यमू तो उपासकू |
अधमु संशई कर्मी | कर्मभ्रष्ट तो अधमोधमु || १९ ||
धन्य तो सर्व हि जाणे | सार शोधूनि घेतसे |
प्रत्ययेवीण मानेना |तो ज्ञाता दुर्लभु जनी || २० ||
इति श्री फूट योग समास समाप्त ||
सामान्य माणसे दगड गोट्यांना शेंदूर फासून देव बनवतात अंतरात्मा आपल्या
शरीरात असणारा देव असतो .तो देह चालवणारा असतो ,तो
आपल्याकडून विचार
करवतो ,वेगवेगळ्या हालचाली घडवून आणतो .परंतू हा अंतरात्मा
चंचळ आहे .त्याही
पेक्षा निरंजन असणारा देव श्रेष्ठ आहे . हा श्रेष्ठ देव चळत
नाही ,त्याच्या स्थिती
पासून ढळत नाही ,मळत नाही ,तुटत नाही ,फुटत नाही ,शेवट
पर्यंत जसाच्या तसा
राहतो .या सृष्टी पूर्वी जसा होता ,आता तसाच आहे ,तसाच
सृष्टी प्रलय झाला तरी
तसाच राहणार आहे .
गीतेत अर्जुनाने भगवंताला आठव्या अध्यायात विचारले आहे की
ब्रहम म्हणजे काय
तेव्हा भगवंतांनी सांगितले की अक्षर म्हणजे ब्रहम आहे .,जे
अविनाशी आहे .त्याउलट
क्षर म्हणजे नाशिवंत आहे .क्षर म्हणजे द्वंदातमक स्थिती
.अक्षर म्हणजे निर्द्वंद
स्थिती .जिथे निर्द्वंद अवस्था आहे ,सगळ्या द्वंद्वावर मात
केलेली आहे ,चित्तात
समत्व आहे त्याला अक्षर म्हणायचे .क्षर म्हणजे पंचभूतिक
,सगुण ,नाशिवांत आहे
.तर अक्षर साक्षी आहे ,कूटस्थ आहे त्याहूनही वरच्या पातळीला
असणारा परमात्मा
आहे. तो निर्विकार ,गुणातीत आहे .पाण्याने भिजवता येत नाही
,त्याचे छेद करता येत
नाहीत , अग्नीने जाळता येत नाही ,तो भूमी नाही ,पाणी नाही
चंचळ वायू नाही
,अंतरात्मा याहून वेगळा आहे .पिंडाचे चार व ब्रह्मांडाचे
चार देहांचे निरसन केले तर
कोण आणि काय उरेल ? तेव्हा निर्गुण परमात्मा उरेल .त्या
निर्गुणाशी गाठ पडेल
,निर्गुणाची अनुभूती येईल .ही अनुभूती येण्यासाठी
त्रिगुणात्मक असलेल्या अष्टदा
प्रकृतीचा निरास करून सत्संगाने गुणातीत असलेले परब्रह्म
प्राप्त होईल .
सारासार विचाराने
व नित्यानित्य विवेकाने दृश्य नासून जाईल ,नाहीसे होईल
सारासार विचार म्हणजे सार कोणते व असार कोणते याचा विचार
.म्हणजे हे दृश्य
विश्व जे नाशिवंत आहे ,ते असार आहे ,हे ओळखणे .नित्यानित्य
विवेक म्हणजे नित्य
म्हणजे कायम टिकणारे व अनित्य म्हणजे नाश पावणारे हे ओळखणे
.त्यावरून दृश्य
असणारे विश्व आपल्याला होणारा भास आहे ,ती कल्पना आहे असे
ओळखणे .परब्रह्म
निर्विकल्प आहे .कल्पना पराब्र्ह्मापर्यंत पोहोचू शकत नाही
.त्याचे वर्णन करता येत
नाही म्हणून तिला अनुर्वाच्य म्हणतात .
मी या परब्रह्माला जाणतो ,तितके मी सांगितले नाही सर्व संग
त्याग करणारा
वृत्तिशून्य महामुनीच ते सांगेल .जेव्हा वृत्ती निवृत्त
होते ,कोणत्याही वृत्ती उरत
नाहीत तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होते .तेव्हा बोलणे
खुंटते ,तेव्हा वाचेने काय
बोलायाचे ? तेव्हा वाच्यांश आणि लक्षान्श दोन्ही नाहीसे
होते .
पंचीकरण आणि महावाक्यांचा अभ्यास ,चार देहांचे निरसन केले
अहं सोहं कांहीच उरत
नाही .पंचीकरण म्हणजे पंचमहाभूते एकमेकात मिसळलेली आहेत ,ती
कशी नाशिवंत
आहेत ,ती पंचमहाभूते म्हणजे मी नाही हे समजावून घेणे
.महावाक्यांचा अर्थ
समजावून घेऊन चारी देहांचा निरास केल्याने अहं आणि सोहं उरत
नाही .पण हे सर्व
कोणी पहावे व कोणी बोलावे ? साधक तर गुप्त झाला कारण त्याला
परब्रह्माचा
अनुभव आला तर तो बोलायला शिल्लक उरत नाही .
जड सर्व जाणतात ,कोणी चंचलाकडे धावतात .पण निश्चळा कडे
,त्या पराब्र्ह्माकडे
लक्ष देणारे विरळाच असतात .
येथे समर्थ माणसांचे प्रकार सांगतात .:उत्तम ,मध्यम .अधम
,अधमाधम .ज्याला
प्रत्ययाचे ज्ञान असते तो उत्तम असतो .जो शास्त्राच्या
निर्णयाप्रमाणे चालतो तो
मध्यम असतो . जो लोक धाटीचा असतो तो अधम असतो .धाटी म्हणजे
अविचारी
किंवा फूस .जो अविचारी पणाने वागतो ,लोक धाटी चा म्हणजे लोक
म्हणतील तसे
वागणारा असतो तो अधम असतो .जो पाषांडी म्हणजे नास्तिक असतो
तो अधामोधम
असतो .
उत्तम कल्पनातीत असतो ,ज्ञानी ,स्वस्वरूप जाणणारा ,असतो
.मध्यम शब्द बोलणारा
आलेला अनुभव बोलून दाखवणारा असतो .अधम नेणता अज्ञानी असतो
तरीही त्याला
,गर्व असतो .अधमाधम पापी असतो
उत्तम ज्ञानी असतो ,मध्यम उपासक असतो ,अधम त्याने केलेल्या
साधनेत ,कर्मात
संशय घेणारा असतो .तर अधामोधाम कर्मभ्रष्ट असतो .
जो सर्वच जाणतो तो धन्य असतो .तो सार असेल ते घेतो
.प्रत्यायाशिवाय जो
कोणतीच गोष्ट मानत नाही ,तो ज्ञाता या जगात खरोखरच दुर्लभ
आहे .