अघटी ते उदंड केले | विवंचिता ते समजोन
गेले |
आता दया का नुपजे मनासी | तुळजे दयाळ
दयाळ कैसी ||१ ||
दयाळ होसी करिसी कुढावा | समजोन गेला
सामर्थ्ये यावा |
थोडे जीर्ण हे वेर्थ गेले | जगदेश्वरी
त्वां सनाथ केले || २ ||
अन्याय माझे बहुसाल जाले | समजोनिया ते
क्षमा चं केले |
अज्ञान ते बाळक काय जाणे | जननी करी ते
कांहीच नेणे || ३ ||
संनिध माता परी वोळखेना | वदवितसे ते
काही कळेना |
रडोच जाणे समजोची नेणे | मातेविन ते मग
दैन्यवाणे || ४ ||
अनाथनाथे जगदैकनाथे | संसारकोडे उगवी
समर्थे |
निवेदने मानस उगविले | भूमंडळीत्वा मज
धन्य केले || ५ ||
मी काय फेडू उपकार तुझा | तुझिये दयेचा
संसार माझा |
तुजवीण माझे कांहीच नाही | येथार्थ आहे
समजोन पाही || ६ ||
जगदांतरी तू मदांतरी तू | जगत्रयी तू तू
तू चि मी तू |
येहलोक तू तू परत्र तू तू | अगणित तू तू
सायोज्यता तू तू || ७ ||
हे तुळजामाते ,तू खरोखरच उदंड केलेस .जो
विचार करतो त्याला ते कळते .हे तुळजे भवानी आताच तुझ्या मनात दया का उत्पन्न होत
नाही ?
तू दयाळू आहेस ,नेहमी भक्तांचे रक्षण
करतेस , तुझ्या सामर्थ्याचा प्रत्यय आला जे जीर्ण ,सुकलेले सामर्थ्य हीन होते ते
वाया गेले होते पण तू हे जगदेश्वरी आम्हाला सनाथ केलेस .आमच्या वर तू कृपा केलीस .
मी खूप अन्याय केले ,पण तू मला समजून
घेतलेस आई काय आपल्या मुलांसाठी करते ते कदाचित अज्ञान बालकांना समजत नाहीत ,तसे
तुळजाभवानीचे ही आहे .तुळजामाता जे काही करते ते आपल्याला कळत नाही .माता आपल्याला
जवळ असलेली आपल्याला कळत नाही .तिला आपल्याला ओळखता येत नाही .आपल्याला फक्त रडू
येते ,समजून घेता येत नाही .त्यामुळे आपण मातेशिवाय आपण दैन्यवाणे होतो ,अनाथ होतो
.हे तुळजामाते ,तू अनाथांची नाथ आहेस ,या संपूर्ण जगाची नाथ आहेस ,या संसाराचे
कोडे तू समर्थपणे सोडवायला मदत करतेस .तुला निवेद्न करून म्हणजे आत्मनिवेदन करून
म्हणजे तुला पूर्ण समर्पित करून मी या भूलोकात मी धन्य झालो .मी तुझा उपकार कसा
फेडू ? तुझ्या दयेने माझा संसार [समाजाचा ] झाला .तुझ्याशिवाय माझे कांहीच होणार
नाही .ही गोष्ट खरीच आहे .हे तू समजून घे .तू या जगाच्या अंतरी आहेस ,माझ्यामध्ये
ही तूच आहेस .तू या जगातच आहे .या ईहलोकी तू आहेस ,परत्री आहेस .तू अगणित आहेस ,तू
सायोज्यता मुक्ती तू आहेस .