तुळजाभवानी स्तोत्र
सर्वांरंभी मुळारंभी | वंदिजे गणनायकू |
विद्या सुबुधी देता हे | सर्वत्र तो
भूमंडळी || १ ||
चतुर्भुजा वेदमाता | वीणापुस्तकधारिणी |
वंदिता अंतरी वाढे | स्फुर्तीरूपे
प्रकाशते || २ ||
मुळीची मूळमाया ते | आदिशक्ती परमेश्वरी
|
आमुची कुळदैव्या ते | म्हैसासुरासी
मर्दिनी || ३ ||
शक्तिरूपे जगन्माता | वर्तते जगदांतरी |
त्रिलोकी जितुके प्राणी | शक्तीवीर वृथा वृथा || ४ ||
प्रसिध तुळजामाता | श्रीराम वरदायिनी |
कुळासी पाळिले मुळी | आतां आम्हासी
पाळिते || ५ ||
चुकता शक्ती नेता हे | सामर्थ्ये ते कैचे
पुढे |
कृपाळू जन्ननी वोळे | तत्काळ मनकामना ||
६ ||
बहुतांचे कुळी आहे | पाहा प्रचीती रोकडी |
कृपेने रंक ते राजे | सामर्थ्ये वर्तती
जनी || ७ ||
चुकता क्षोभते नेटे | राजे रंक करी
पून्हा |
आरोग्या रोग लाविता | फोडी सर्वांग
खांडके || ८ ||
धबधबा गळती काया | वोल्या कुष्टेंचि
नासती |
शुभ्र सर्वांग होता हे | नायटे फुटती बळे
|| ९ ||
हात जाती पाय जाती | जींव्हां जाती फुटोनिया |
हात जाती पाय जाती | जींव्हां जाती फुटोनिया |
बोलता तुळजा माता | पुन्हां सर्वांग
नेटके || १० ||
श्रोत्र जाती नेत्र जाती | वाचा जाती न
बोलवे |
उदंड रोग व्याधी त्या | किती म्हणोनी
सांगणे || ११ ||
धडासी विघडी रागे | दयेने नीट होतसे |
संपन्न मागती भिक्षा | चालेना तिज वेगळे
|| १२ ||
बोलिले चुकती प्राणी | त्यासी दंड परोपरी
|
पिशाच्ये खेळती अंगी | फेंफरे भरती बळे
|| १३ ||
प्रचीत ये चमत्कारे | तोषतां टे जगदेश्वरी |
नेसते निबार किती | यती टे लोटांगणी ||
१४ |
बगाडे खेळती निसें | जिव्हा कापून वाहाती
|
कुलुपे घालती तोंडी | येक ते सिर वाहाती
|| १५ ||
पून्हा ते लागती सीरे | जिव्हा येती
करांगुळ्या |
सामर्थ्ये जागते मोठे | जागती जगज्योती
हे || १६ ||
सर्वात आरंभी मुळारंभ करताना गणनायकाला वंदन करू . गण
म्हणाजे माया ,प्रकृती शारदा ,तिला चेतवणारा तो गणेश .शिवगणांचा किंवा
ईंद्रियगणांचा अधिष , परब्रह्मा मध्ये निर्माण झालेला प्रथम संकल्प म्हणाजे मूळमाया
. मूळमायेचा प्रथम प्रारंभ झाला ,तेथून जगदरचनेचा प्रारंभ झाला म्हणून त्याला
मुळारंभ म्हणतात .असा हा गणेश सर्वांना विद्या ,सुविद्या देतो .मूळमाया म्हणजे
गणेश आणि शारदा .
शारदा चतुर्भुज रूपात असते . ती वेदांची
माता म्हणजेच वेदांची उत्पती करणारी ,वेद
निर्माण करणारी आहे .तिने वीणा पुस्तक धारण केलेले असते . तिला वंदन केले की
परमार्थाची साधना करणा-या साधकाला आत्मचिंतनाची कला शिकवते .तिच्या कर्तुत्वानेच
परा ,पश्यंती ,मध्यमा या तीन वाणीं मध्ये जे स्फुरण पावते ते वैखरीच्या सहाय्याने
शब्दात प्रगट होते .तीन लोक असलेले हे विश्व तीच निर्माण करते व तीच मोडून ही टाकते .शारदा ईश्वराची निवांत
,निश्चळ ,निर्मळ अवस्था आहे .त्यामुळेच ती योग्यांना ध्यान लावायला मदत करते
.तिच्या मदती शिवाय भगवंताचे स्तवन ,भजन
,भक्ती करता येत नाही .ती सतरावी जीवनकला आहे त्यामुळे तिच्या कृपेने
स्फूर्ती प्राप्त होते .
मुळारंभ झाला तेव्हा मूळमाया म्हणजेच
शारदा तीच तुळजाभवानी ! तीच आमच्या कुलाची कुलदेवता आहे .तीच आदिशक्ती आहे ,तीच
परमेश्वरी आहे .तीच
महिशासुरमर्दिनी आहे .
तीच शक्तीरुपिनी आहे .जगन्माता आहे .तीच
या जगात राहते .तीच विचारवंताला विचार करायला लावते .ती अखंड स्फूर्ती देते
.योग्यांना ध्यान करण्याची ,साधकांना अनुसंधानात राहण्याची ,सिध्दांना समाधीत
स्थिर राहण्याची शक्ती तिच्यापासूनच मिळते .ती जगातील सौंदर्याचे मूळ आहे अशी
शारदा जगाचे पालन करते .
तुळजामाता प्रसिध्द आहे .तीनेच
श्रीरामांना वरदान दिले आहे ,म्हणूनच तिला रामवरदायिनी म्हणतात .तिने आमच्या
कुलाचे पालन केले आहे .आता ती आमचे पालन करत आहे असे समर्थ म्हणतात .
चुकले तर शक्ती मिळत नाही ,सामर्थ्य ही
मिळत नाही . पण तुळजा भवानी आई प्रेमळ आहे .ती आपल्या ईच्छा पूर्ण करते .ती पुष्कळ
कुलांची कुलदेवता आहे .तिच्या कृपेने भिकारी राजे झालेले आहेत याची प्रत्यक्ष
प्रचीती येते .पण तिचे करण्यात चूक झाली तर राजेही भिकारी झालेले पहायला मिळतात .निरोगी
माणसाच्या अंगावर गळू उठतात .ओला कुष्ट रोग होतो .अंगातून ,कुष्ट थबथबा गळायला
लागते . अंग शुभ्र होते .अंगावर नायटे उठतात . हात ,पाय जातात ,जीभ फुटतात .पण
तुळजामातेला नवस बोलले तर सर्वांग नीट होते . कान जातात ,डोळे जातात .बोलता येत
नाही .अनेक रोग ,व्याधी होतात .
तिच्या रागाने चांगले चालू असेल तर ते
बिघडते .तिच्या दयेने मात्र सर्व चांगले होते .तिच्या दारी भिक्षा मागावीच लागते .
संपन्न ,श्रीमंत माणूसही भिक्षा मागतो .
तिला लोक नवस बोलतात पण तो फेडत नाहीत
,त्यांना ती दंड करते .ती अंगात पिशाच्च खेळवते ,अंगात फेफरे येतात .
लिंबाचा पाला नेसून ,किंवा लोटांगणे घालत
तिच्या दर्शन घेतले तर तिला आनंद होतो .काही लोक तिला विचित्र नवस बोलतात .खांबाला
टांगून हेलकावे घेतात ,जीभ कापून देतात ,तोंडाला कुलूप लावतात ,कोणी डोके कापून
वाहतात .पण तिचे सामर्थ्य असे की डोके पून्हा जागेवर बसते ,जिभेला करंगळ्या फुटतात
.तिचे सामर्थ्य असे जागृत आणि मोठे आहे