अध्यात्मसार
दुखदारिद्र उद्वेगे | लोक सर्वत्र पीडिले
|
मुळीची कुळदेव्या हे | संकटी रक्षिते बळे
|| १ ||
राम उपासना माझी | त्रैलोक्य सुख पावले |
सोडिले देव ईंद्रादी | तोडिली बंधने बळे
|| २ ||
कीर्तीसी तुळणा नाही | प्रतापे आगळा बहु
|
न्याय नेमस्त हे लीळा | ण भूतो ण
भविष्यती || ३ ||
उन्मत्त रावणे येणे | त्रैलोक्य पीडिले
बळे |
देव ते घातले बंदी | कैपक्षी राम पावला || ४ ||
रावणे चोरिली सीता | मावकापट्य साधिले |
धुंडिता धुंडिता सीता |शुद्धी कोठे न
संपडे || ५ ||
रामसौमित्र हे बंधू | उदास धाकुटे वये |
श्रीमंत लक्षणे मोठी | दिसती मुख्य देवसे
|| ६ ||
मूर्ख ते नेणती चिन्ह | जाणत्या वेधू
लागला |
दिसती थोर सामर्थ्ये | श्रीहरी भगवान ते
|| ७ ||
फिरती थोर अरण्ये | कर्कशे गिरीकंदरे |
कपाटे विवरे झाडी | झोतावे दर्कुटे कडे
|| ८ ||
आरण्य हिंडता तेथे | कुमारी देखिली वनी |
कुमारी बाळलीळा ते | दिसे त्रैलोक्य जननी
|| ९ ||
रूप ते नेटकी बाळा | लावण्य बाणले असे |
दैदिप्य खेचरी लीळा | पार्वती लक्षुमी
जशी || १० ||
यक्षिणी अप्सरा देव्या | शेषगधर्वकुमरी |
काय की कोण की आहे | काही केल्या कळेचिना
|| ११ ||
चंचळा चमके नेटे | मोहनी मनमोहनी |
ते सूर्यवंशीचे राजे | विख्यात भुवनत्रयी
|| १२ ||
नेमस्त न्याय नीतीचे | करिती धर्मस्थापना
|
परस्त्री नेणती दृष्टी | ब्रह्मचारी
फणीवरू || १३ ||
येकांती त्या वनामध्ये | देखिले त्या
कुमारीने |
कुमारी देखिली त्यांनी | बोलती ते
परस्परे || १४ ||
कैची तू कोण तू काई | नाम ते कोण ते तुझे
|
म्हणे रे मीच तुकाई | जा तुम्हा वरू
दिधला || १५ ||
मनाच्या कामना होती | सीता शुधी करा
तुम्ही |
सूर्यवौंशी माहाराजे | बोलती ते कुमारीसी
|| १६ ||
वरू त्वां दिधला आम्हां | सत्य कैसेनि
जाणिजे |
येथून दाविसी लंका | तरीच वरू हा खरा ||
१७ ||
या काव्यात समर्थांनी त्या काळाची
परिस्थिती सांगितली आहे .सर्वत्र लोक दु:खाने वं दारिद्र्याने त्रासले होते .पण
तुळजाभवानी जी कुळदेवता आहे ती सर्वांचे संकटात रक्षण करते .समर्थ म्हणतात की टे
राम उपासना करतात .त्या उपासनेने त्रैलोक्याचे सुख त्यांना मिळाले .कारण या
श्रीरामांनीच ईंद्रादी देव ,ज्यांना रावणाने बंदी करून ठेवले होते त्यांना सोडवले
.त्या श्रीरामांच्या कीर्तीला तुळणा होत
नाही .त्यांचा पराक्रम ही आगळा वेगळा आहे .त्यांनी केलेला न्याय सुध्दा न भूतो न
भविष्यती आहे .लोक रंजनासाठी प्रत्यक्ष अग्निदिव्य केलेल्या शुध्द पत्नीचा त्याग
केला .उन्मत्त रावणाने त्रैलोक्याला त्रास दिला ,देव ,ब्राम्हण सर्व सामान्य जनता
कोणीच सुटले नाहीत त्याच्या त्रासापासून ! त्यांची त्रासातून सुटका करण्यासाठी
श्रीराम धावून आला .रावणाने कपट करून ,साधूचे सोंग घेऊन [माव –सोंग ] देवी सीतेचे हरण केले .श्रीराम वं लक्ष्मण तिला शोधत
हिंडत होते पण सीतेचा शुधी [शोध ] लागत नव्हता .राम वं सौमित्र [लक्ष्मण] हे लहान
वयाचे भाऊ हिंडत होते .वय लहान पण कीर्ती महान असते ना तसे ते देवतां प्रमाणे दिसत
होते .मूर्खांना त्यांची सुचिन्ह दिसली नाहीत पण जे जाणते होते ते त्यांचे
सामर्थ्य ओळखून होते .ते मोठ्या मोठ्या अरण्यात घोर पर्वंतातील गीरीकंदरात [गुहा
],त्यांनी सीतेला सर्वत्र शोधले –डोंगरातील गुहा
,द-या कडे सर्वत्र शोधले .अरण्यात हिंडत असताना एक दिवस त्यांनी एक कुमारी बघितली
.ती खरे तर त्रैलोक्य जननी होती .ती तिची बाळ लीलाच होती .तिचे रूप नेटके
,लावण्यवती होती .ती खेचरीलीळा [आकाशात
उडणा-या पक्ष्याच्या लीला ]करत होती .ती
पार्वती लक्ष्मी प्रमाणे भासत होती .ती यक्षिणी ,अप्सरा ,गंधर्व कुमारी ती कोण
होती ते दोघा बंधूंना कळत नव्हते .ती चंचळ ,चमकणारी ,मोहिनी ,मनमोहिनी होती ,ते
दोघे सूर्य वंशाचे राजे होते .सुर्यवंश त्रिभुवनात प्रख्यात होता .या वंशातील राजे
न्याय नीति पाळणारे होते .परस्त्री दृष्टीला पडताच ते तिच्याकडे पहात नसत .त्या
वनात एकांतात त्या कुमारीने त्यांच्याकडे पाहिले ,त्या दोघांनी ती कुमारी पाहिली
.दोघे तिच्याशी बोलू लागले ,तू कोण आहेस तू इथे काय करतेस ? तुझे नाव काय आहे ? ती
कुमारी म्हणते –अरे मीच तुकाई .मी
तुम्हाला वर देते .तुमच्या मनातील ईच्छा पूर्ण होतील .सीतेचा शोध घ्या
.सूर्यवंशाचे राजे तिला म्हणतात –तू आम्हाला वर
दिलास ,पण तो खरा आहे की नाही ते कसे कळणार ? तू ईथून आम्हाला लंका दाखव .तर तुझा
वर खरा असे आम्ही समजू .|| १७ ||
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें