समर्थ कल्याण संवाद
सांग बा कल्याणा तुझी स्थिती मज आता |
कोण्या योगे कोण्या पंथे ऐक्य रघुनाथा
||धृ ||
उपदेशिले ज्ञान ते तुझे अंतरी आले |
भेदबुद्धी सर्वही गेली संशय मावळले |
देहे स्मृतीचा लोप जाला कोण मी कळले |
ऐसा प्रत्यय जाला की नाही ते सांग ये
वेळे ||१||
स्वप्न अवस्था निरसुनि बोध जागृत जाले की
|
भजनमुद्रा भक्ती कळा निज वोळखिले की |
सद्गुरू महिमा ऐसे जाणूनी सुरती भोगिले
की |
मोहो जाउनी निजस्मृती प्रतीती बाणली की
||२||
वृत्ती निश्चळ होती किंवा चंचळ हे जाली |
पाहुनी स्वरुपालागी तटस्थ होऊनि का
इतुक्या |
माजी येक प्रत्यय सांग ये वेळी ||३||
ते देह की आत्मा होय कोण मज सांग |
बध्द मुक्त कोण कोणा वासनेचा भोग |
कैशी स्थिती पाहुनी सेविसी श्रीरंग |
रामदासी प्रश्न केला निज अभंग ||४||
समर्थ कल्याणाला विचारतात ,कल्याणा ,तुझी
स्थिती आता कशी आहे ते तू मला सांग .तू रघुनाथा बरोबर कोणत्या योगाने ,कोणत्या
मार्गाने ऐक्य साधलेस ?
तुला ज्या ज्ञानाचा उपदेश केला ,ते
तुझ्या अंतरात साठले का ?
मी तू हा तुझ्यातला भेद नाहीसा झाला का ?
तुझे सगळे संशय मावळले का ? तुझी देहबुद्धी नाहीशी होऊन तुझ्या देहबुद्धीचा म्हणजे
मी देह आहे या बुद्धीचा लोप झाला का ? मी कोण हे तुझे तुला कळले का ? मी म्हणजे
चैतन्य ,मी म्हणजे आत्मा आसा तुला प्रत्यय आला का ? मला सांग तुला प्रत्यय आला का
? .
स्वप्न अवस्था म्हणजे अज्ञानावस्था निरसन
होऊन तुझा बोध जागृत झाला का ?भजन मुद्रा ,भक्ती या सगळ्या गोष्टी तू ओळखल्यास का
?तू सद्गुरुंचा महिमा जाणलास का ? तुझा मोह नाहीसा होऊन तुझी निजस्मृती म्हणजे
तुझी स्वरूपस्थिती तुझ्या मनात बाणली का ?
तू स्वरूपाला तटस्थ होऊन पाहिलस तेव्हाचा
एक तरी अनुभव मला सांग .मला सांग की तू देह आहेस की आत्मा तू बध्द आहेस की मुक्त
,की तुझ्या वासनेचा भोग आहे ?तू कशा स्थितीत ,बध्द ,मुक्त की वासना युक्त स्थितीने
श्रीरंग भगवंत पाहिलेस ? असा प्रश्न समर्थ रामदास कल्याण स्वामींना विचारतात
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें