बुधवार, 21 मई 2014

भवानी स्तवन

भवानी स्तवन
काळिका काळिका ऐसे | ऐकिले बहुतांपरी |
प्रत्ययो सांगती मोठा | पुरवी मनकामना || १ ||
उदंड ऐकिली कीर्ती | मूर्ती फार पराक्रमी |
चित्त हे वेधले माझे | पुरवी मनोकामना || २ ||
प्रचीती रोकड्या येती | लोक कल्याण पावती |
उभाउभी चमत्कारे | पुरवी मनकामना || ३ ||
फांकली कीर्ती ते मोठी | उदंड विश्वतो मुखी |
धन्य धन्य जगन्माता | पुरवी मनकामना || ४ ||
सानीमध्ये पावलो तुझे | चिंतिता पावसी बळे |
आश्चीर्ये वाटले मोठे | पुरवी मनकामना ||  ५ ||
मनांत चिंतिले जाणे | खूण खुणेसी बाणली |
खरेचि सांगती सर्वै | पुरवी मनकामना || ६ ||
पूर्वीसी राहणे तुझे | पूर्ण सामर्थ्य घेतले |
पूर्व पुण्य फळा आले | पुरवी मनकामना || ७ ||
आपुली कीर्ती सांभाळी | अद्भुत करणी करी |
आनंदरूप तू माता | पुरवी मनकामना || ८ ||
दास मी रघुनाथाचा | सामर्थ्ये तुज बोलिलो |
न्यून्यपूर्ण क्षमा कीजे | पुरवी मनकामना || ९ ||
कालीमाता कालीमाता असे नाव ऐकले आहे .खूप लोकांकडून ऐकले आहे .मला असा प्रत्यय आला आहे की कालीमाता मनोकामना म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करते .तिची खूप कीर्ती ऐकली होती की कालीमाता खूप पराक्रमी आहे .तिच्या पराक्रमाने माझे मन [चित्त ]वेधून घेतले आहे तिच्या कृपेने लोकांचे कल्याण होते चमत्कार करून मनातील इच्छा पुरवते .त्यामुळेच तिची कीर्ती सर्वत्र पसरते .संपूर्ण विश्वाच्या मुखी तिची कीर्ती  आहे .अशी ही माता  सर्वांची मनोकामना पूर्ण करते .ती खरोखर धन्य आहे .तिला सानी [लहान असताना] मला ती प्रसन्न झाली .तिचे चिंतन केले की पावते हे पाहून आश्चर्य वाटले .आणि ती मनातील इच्छा पूर्ण करते हे पाहून आश्चर्य वाटले .मनात जेव्हा चिंतन केले तेव्हा तिची खूण पटली .तू पूर्वी होतीस आताही आहेस .पूर्ण सामर्थ्याने आहेस .माझे पूर्व पुण्य फळाला आले म्हणून माझी मनोकामना पूर्ण केलीस .तू तुझी कीर्ती सांभाळतेस ,अनेक अद्भुत गोष्टी करतेस .तू आनंद रूप आहेस.मी रघुनाथाचा दास आहे .मी जर काही चुकीचे बोललो असेन तर मला क्षमा कर आणि माझी मनोकामना पूर्ण कर .


२२
भवानी स्तवन
माय तू बाप तू बंधू | गणगोत समस्तही |
तुजवीण मजला नाही | भवानी भक्त वछले || १ ||
विदेशी येकला आहे | तुजवीण निराश्रयो |
दयेने सर्व सांभाळी | भवानी भक्त वछले || २ ||
संकटे वारिली नाना | वाढविले परोपरी |
नेणतां चुकलो तुला | भवानी भक्तवछले || ३ ||
इछिले पुर्विले सर्वै | कामना मनकामना |
संकटी रक्षिले माते | भवानी भक्तवछले || ४ ||
वास मी पाहतो तुझी | दास मी कष्टलो बहू |
आनंदी नांव राखावे | भवानी भक्तवंछळे || ५ ||

तू माझी आई ,माझे वडील ,माझे सगेसोयरे आहेस.तुझ्याशिवाय मला कोणीही नाही .मी दूरदेशात एकटा आहे .तुझ्या शिवाय मला कोणाचाही आश्रय ,आधार नाही .डू माझ्यावर दया कर आणि भक्त वत्सले ,माझा सांभाळ कर .तू माझ्यावर आलेली अनेक संकटांचा नाश केलास .मी तुला न जाणल्या मुळे मला तू समजली नाहीस .तू मला हव्या असणा-या सर्व गोष्टी मला दिल्यास .संकटात माझे रक्षण केलेस .मी तुझी वाट पाहतो .श्रीरामांचा मी दास आहे .मला खूप कष्ट झाले .आनंदी हे नाव तू राखावेस .हे भवानी तू भक्त वत्सल आहेस .माझी मनोकामना पूर्ण कर












कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें