भवानी देवी
कामाने सारिखी वाचा | गोविती बहुतांपरी |
तुष्टता तुळजा माता | पुरती मनकामना ||१७
||
चुकतां दाविते साक्षी | कोण्हीयेके चुको नये |
चुकतां दाविते साक्षी | कोण्हीयेके चुको नये |
बालका
जननी पाळी | तैसी ते पाळीती जना || १८ ||
कृपाळू जननी मोठी | अन्याय क्षमणे बहू |
मागीणी जोगिणी पत्रे | कुमारी स्वासिणी
ब-या || १९ ||
गोंधळ भोग घालावे | बोलिले ते चुको नये |
असोनी वचणे खोटे | अभावे बुडती घरे || २० ||
वौंशची बुडती लोकी | ऐशा उदंड ख्यानती |
असोनी वचणे खोटे | अभावे बुडती घरे || २० ||
वौंशची बुडती लोकी | ऐशा उदंड ख्यानती |
देऊ जाणे घेऊ जाणे | भक्ती ते पाहिजे बरी
|| २१ ||
सीवकळा सीध देव्हारे | तेथे पुसोन पाहाणे |
सीवकळा सीध देव्हारे | तेथे पुसोन पाहाणे |
चुकले पडते ठाई | सद्य प्रचीत रोकडी ||
२२ ||
आनंद वाढवी लोकी | आनंदी याच कारणे |
आनंद वाढवी लोकी | आनंदी याच कारणे |
तुळजा वोळवी घ्यावी | पुजावी बहुतांपरी
|| २३ ||
वेसणी घालिती नाकी | जावळी जट राखती |
लेकुरे वाहाती देवा | वैभवी बहुतांपरी ||
२४ ||
पूजिता तुळजा माता | तेणे सुखची होतसे |
विध्योक्त होम विधाने | नौरात्र
घटस्थापना || २५ ||
मेहुणे पूजिती भावे | नाना पदार्थ देऊनी
|
संतुष्ट कुमारी कीजे | तेणे संतुष्ट
होतसे || २६ ||
बोलके नेटके पक्षी | नाना रंगे नाना गुणी |
बोलके नेटके पक्षी | नाना रंगे नाना गुणी |
तैसीच स्वापदे नाना | देवालई परोपरी ||
२७ ||
कुमरी कुमर द्रव्ये | नाना अलंकार नेटके |
कुमरी कुमर द्रव्ये | नाना अलंकार नेटके |
नाना रंगे नाना वस्त्रे | आमोल्ये
बहुजिनसी || २८ ||
विलास भोग देवाचे | किती म्हणोन सांगणे |
संगीत गीत वाद्येते | सुगंध बहुतापरी ||
२९ ||
तांबोल भोजने नाना | नाना पुष्पे फळे बहु
|
उत्तम सहायाने याने | वैभवा तुळणा नसे ||
३० ||
रामदास म्हणे माझी | माता हे जगदीश्वरी
ऐश्वर्य सर्व शक्तीचे | विवेके प्रत्यये
पाहा || ३१ ||
शक्तीने मिळते सर्वै | शक्तीने भोग होतसे
|
पूजिली बत्तीसा श्लोकी | आदिशक्ती
नारायणी || ३२ ||
ईछेप्रमाणे बोलणे असेल ती सगळ्यांना
समाविष्ट करून घेते तुळजामाता संतुष्ट झाली मनातील ईच्छा पूर्ण होतात .चुकार
लोकांना सुधारते .
चुकार लोकांना साक्ष दाखवते .चुकार
म्हणजे नवस बोलणारे ,पण नवस न फेडणारे ,अशा लोकांना नवस फेडला तर काय होते ते
दाखवणारी आहे .
ही जननी अतिशय कृपाळू आहे .अन्याय क्षमा करते
.लोकांना सुधारण्यासाठी संधी देते .तिचा गोंधाळ घालावा .जो नवस बोलाल तो फेडायला
चुकू नये .खोटं बोलू नका .तुमच्या मनात तिच्याबद्दल भाव नसेल तर उपयोग होणार नाही
.घरे बुडतात .घराणी नाश पावतात .अशी तिची ख्याती आहे .ते आपल्याला देते पण कबुल
केले असेल तर तिला ते द्यावे ही लागते .शिसवी चा सुंदर तयार देव्हारा तुम्हाला
दिसेल .त्या देवळात तुमचे तुम्हाला चुकलेले कळेल .त्याची रोकडी प्रचीती तुम्हाला
येईल .लोकांमध्ये ती आनंद वाढवते .त्या तुळजाभवानी ला ओळखा .तिचे पूजन करा .नाका
मध्ये वेसणी घाला .मुलांना तिला वाहतात ,मग खूप वैभवाला मिळतात .तुळजामातेचे पूजन
केले तर सुख मिळते .विधीपूर्वक होम हावने केली तर नवरात्रात घट स्थापना केली
.कुमारिकांचे पूजन केले तर तुळजामाता संतुष्ट होते .बोलके ,छान नाना रंगाचे ,नाना
गुणांचे पक्षी पाळले तर तुळजा भवानी संतुष्ट होते .त्याप्रमाणे निरनिराळी श्वापदे
देवालयात ठेवले तरी तुळजाभवानी संतुष्ट होते .तिला फळे ,फुले द्रव्य अर्पण करा
.अनेक अलंकार ,अनेक रंगाची वस्त्रे ,अमूल्य वेगवेगळ्या वस्तू अर्पण करा .अनेक प्रकारच्या
सुख देणा-या गोष्टी ह्या देवाचा भोग आहेत . संगीत ,गाणे ,वाद्ये ,अनेक प्रकारचे
सुगंध हे सर्व देवांचे भोग आहेत .विडा ,भोजन ,अनेक प्रकारची उत्तम भोजने ,अनेक
प्रकारची फुले ,फळे ,उत्तम बिछाने ,उत्तम वाहने ,यामुळे त्यांच्या वैभवाला तुलना
नसते .समर्थ रामदास म्हणतात ही तुळजामाता ह्या जगदाची ईश्वरी आहे ती सर्व शक्तींचे
ऐश्वर्य आहे .याचा तुम्ही वाचकहो ,विवेकाने ,विचाराने प्रत्यय घ्या .शक्तीने सर्व
मिळते .शक्ती असेल तर आपोआप सर्व गोष्टी मना सारख्या होतात .तुळजाभवानी शक्ती आहे
.म्हणून ह्या ३२ श्लोकात आदिशक्ती नारायणी ची पूजा केली आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें