आदिशक्तीचा लागला लो
लो लो लागला लो | आदिशक्तीचा लागला लो |
अंतरी लो बाहेरी लो | जिकडे तिकडे लागला
लो || १ ||
अंडज लो जारज लो | स्वेदज लो उद्भिज लो |
देवा लो दानवा लो | सिद्ध साधका लागला लो
|| २ ||
दास म्हणे तोचि जाणे | सद्गुरू वचने सुख
बाणे || ३||
लो म्हणजे लळा लागला आदिशक्तीचा लळा
लागला . आदिशक्ती म्हणजे परब्रह्माची शक्ती .परब्रह्माच्या ठिकाणी जो संकल्प उठला
एको हं बहुस्याम | मी एक आहे अनेक व्हावे .तो संकल्प दोन शक्तीनी प्रकट होतो –ज्ञान शक्ती व क्रियाशक्ती ती क्रियाशक्ती म्हणजेच आदिशक्ती
.अंतरात ,बाहेरील गोष्टीत लळा लागाला . अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे , जन्माला
येणारे , घामातून निर्माण होणारे ,या सर्व प्रकारच्या प्राण्यांना लळा लागला .
देवांना ,दानवांना ,सिद्ध साधक सर्वांना लळा लागला .दास म्हणजे समर्थ रामदास
स्वामी म्हणतात की सद्गुरू वचनांनी सुख मिळते .
ब्रह्मकुमारी शारदा वरदा | ब्रह्मकुमारी
शारदा ||धृ ||
साधकाचे अभ्यंतरी | चतुर्विद्या
वागेश्वरी || १ ||
स्फुर्तीरूपे प्रकाशली | वाचारूप
अनुवादली || २ ||
रामदासी कार्यसिद्धी | चित्ती सहज समाधी
|| ३ ||
शारदा ब्रह्माच्या स्फुरणाचे म्हणजे
मूळमायेचे शक्ती रूप अंग .ती वेदांची आई ,ब्रह्मदेवाची कन्या ,नादाचे जन्मस्थान
,वाणींची स्वामिनी ,वागेश्वरी म्हणजे परा ,पश्यंती ,मध्यमा व वैखरी या चारही
वाणींची उगमस्थान असलेली आहे ती स्फूर्ती रुपाने माझ्यामध्ये प्रकाशली
,माझ्यामध्ये वाचेला स्फुरण चढले आणि माझ्याकडून लिहून घेतला गेला . रामदासाचे
कार्य सिद्धी ला जाईल रामदास स्वामीनीं हाती घेतलेले जनजागृतीचे ,धर्मसंरक्षण
करण्याचे कार्य सिद्धीस गेले .चित्तात सहजसमाधी चे समाधान प्राप्त झाले .सहज समाधी
म्हणजे काय ते सांगताना समर्थ म्हणतात :
वस्तू जे का निरोधावी | तेचि सहजसमाधी |
जेणे तुटे आधीव्याधी | भवदु:खाची ||
७-४-४५ ||
असोन माईक उपाधी | तेचि सहजसमाधी |
श्रवणे वळावी बुद्धी | निश्चयाची || ११-१-४४ ||
उपाधी शून्य सद्वस्तु स्वत: बनणे म्हणजे
सहजसमाधी .या समाधीची प्राप्ती झाली की संसारातील दु:ख देणा-या सर्व आधिव्याधी
गळून पडतात .मायामय दृश्याची उपाधी भोवती असूनही निर्गुणाशी अनन्यता टिकून राहिली
की सहजसमाधी म्हणतात .अशी सहजसमाधी समर्थांना साधली होती .
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें