मंगलवार, 3 अगस्त 2010

सवाया

सवाया हा एक काव्य प्रकार जो समर्थांनी नव्याने आणला .त्या काळात मुसलमान फकीर वेगवेगळया प्रकारे त्यांच्या धर्माचा प्रसार करत होते .तेव्हा समर्थांनी सवाया म्हणत लोकांना जागृत करत .आपल्या धर्माची ओळख करून देत .सवाया खूप आवेशाने म्हटल्या जातात .ज्यामुळे लोकांमध्ये धर्म ,देश यासर्वांच्या विषयी प्रेम निर्माण होत असेल .सवाया म्हणताना पहिली ओळ दोनदा म्हणावी लागते .ओवी म्हणताना सव्वा पटीने म्हटली जाते .समर्थ म्हणतात :
तुझा भाट मी वर्णितो रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदे सवाया ।
महाराज दे अंगीचे वस्त्र आता । बहु जीर्ण झाली देहेबुध्दी कंथा । ।
समर्थ म्हणतात ,की रामराया मी तुझा भाट आहे .मी तुझे गुण लोकांना सांगतो आहे .नेहमी मी सवाया विशिष्ट कारणानी गाणार आहे .लोकांना धर्माची ,देशाची भक्ती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे .

2 टिप्‍पणियां:

  1. याप्रमाणे श्री समर्थ विरचित व अन्य सांप्रदायिकांनीही रचलेल्या अनेक सवाया उपलब्ध आहेत, त्या सर्व यथावकाश म्हणून झाल्या की खालील जसवंत लिखित सवाई म्हणून सवाया संपतात.
    साचा उपदेश देत । भली भली मती देत।
    समता समबुद्धी देत । कुमतीकु हरत है ॥१॥
    मार्गकु बताय देत । भाव देत भक्ती देत ।
    प्रेम की प्रचीत देत । आभार भर भरत है ॥
    ग्यान देत ध्यान देत । आत्मकु विचार देत।
    ब्रह्मकु बताय देत । ब्रह्ममय करत है ॥३॥
    मूढमती कहे जसवंत । नाहे जन कछु देत ।
    श्रीगुरु निसिदिन देत । की दे वोही करत है ॥४॥
    ॥बोलीये जय सियाराम॥

    जवाब देंहटाएं
  2. मार्गकु ’बताय’ देत = "मार्गकु दिखाय देत" असे वाचावे

    जवाब देंहटाएं