शनिवार, 26 जून 2010

सद्गुरु समर्थ रामदास


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वराचे ।
कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
उपदेश ज्याला असे राघवाचा श्रवणी जसा गूण परिक्षितीचा
विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
करी कीर्तने नारदासारखाची कदर्यूपरी शांती ज्याचे सुखाची
जया वाटते कांचनू केर जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद चकोरापरी आठवी रामचंद्र
रमा सेवी पादांबुजे जाण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा ४।
पृथुसारिखा अर्चनी वाटताहे खरा अक्रुराच्यासम वंदिताहे
नसे गर्व काही अणुमात्र ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा

3 टिप्‍पणियां:

  1. सुवर्णाताई, सादर प्रणाम,

    समर्थांचे यथातथ्य वर्णन करणारे हे पाचही श्लोक सुंदर आहेत.
    मला तर बेहद्द आवडले आहेत. इथे ते उपलब्ध करून दिल्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

    मात्र, त्यांचा रचयिता कोण आहे ते कळू शकेल का?

    स्नेहाकांक्षू
    नरेंद्र गोळे २०१०११२४ १७३६

    जवाब देंहटाएं
  2. कृपया या लिंक वाचा
    http://www.maayboli.com/node/23327
    http://realshivtharghal.blogspot.com/

    जवाब देंहटाएं
  3. सुवर्णा ताई, आपला ब्लोग निरतीशय सुंदर आहे...

    आपण हे कार्य हाती घेऊन फ़ार मोठे काम करता आहात!

    आपणाकडून अधिकाधीक समर्थसेवा घडो ही समर्थ चरणी प्रार्थना!

    जवाब देंहटाएं